Youtube चॅनेल सुरु करून पैसे कसे कमवाल ?

Youtube चॅनेल सुरु करून पैसे कसे कमवाल ?

नमस्कार, आजच्या या ब्लॉग मध्ये आपण Youtube चॅनेल सुरु कसा करायचा, त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, तसेच चॅनेल सुरु करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घेणे अवश्यक असते व चॅनेल सुरु झाल्यनंतर प्रत्यक्ष कमाइला सुरवात कधी होते, या गोष्टींविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Youtube चॅनेल कसे सुरु करावे?

तर मित्रानो Youtube चॅनेल सुरु करण्यासाठी सर्व प्रथम आपले Gmail अकाऊंट असणे आवश्यक असते, आजकाल जवळ पास सर्वच लोकांचे gmail अकाउंट असते. पण जर का आपले gmail अकाउंट नसेल तर आपण सर्वात आधी आपल्या नावाने किंवा ज्या नावाने आपण youtube चॅनेल सुरु करणार आहात, त्या नावाने gmail अकाउंट काढावे. यानंतर इंटरनेट ब्राउझर open करून gmail Id ने लॉगिन करावे. यासाठी आपण कोणत्याही कंपनीचा इंटरनेट ब्राउझर वापरू शकता, जसे कि मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, Google Chrome किंवा Fire Fox इत्यादी. तर मित्रानो इंटरनेट ब्राउझर open करून gmail Id ने लॉगिन करावे व त्यानंतर youtube ची ऑफिसिअल वेबसाइट open करावी व yotube वेबसाइट वर देखील मेल आयडी ने लॉगिन करावे.

Youtube

इथून पुढे आता आपले youtube चॅनेल सुरु करण्याचे खरे काम सुरु होते. Youtube चॅनेल सुरु करण्याआधी आपण हा चॅनेल कोणत्या कॅटेगिरीमध्ये किंवा कोणत्या nisch मध्ये बनवणार आहोत, हे पाहून घ्यावे. जेणे करून आपण youtube वर टाकणाऱ्या व्हिडिओज ना संबंधित क्षेत्रातील प्रेक्षक वर्ग पाहू शकेल. उदाहरण द्यायचे झाले तर एंटरटेनमेंट, एज्युकेशन, फिल्म, गेमिंग, सायन्स अँड टेकनॉलॉजि, ऑटोज अँड व्हेइकल्स इत्यादी प्रकारच्या कॅटेगिरीचे चॅनेल आपण बनवू शकतो किंवा एखाद्या मायक्रो निस्च मध्ये म्हणजे आपण एंटरटेनमेंट कॅटेगिरीमध्ये फक्त कॉमेडी व्हिडीओ बनवणार असाल तर आपला चॅनेल कॉमेडी निस्च मध्ये येईल,

आणखीन समजावून घ्यायचे असेल तर आपण आणखी एक उदाहरण पाहूया. जसे कि जॉब्स हि एक कॅटेगिरी झाली पण हि कॅटेगिरी खूप विस्तीर्ण आहे, जगातील सर्व प्रकारचे रोजगार यामध्ये समाविष्ट होतात, आणि त्यामुळे या कॅटेगिरीमध्ये आपल्याला कॉन्टेन्ट देखील खूप मोठ्या प्रमाणात बनवावा लागेल. पण जर का आपण त्यातील फक्त एखादे क्षेत्र निवडले जसे कि इंजिनीरिंग जॉब्स किंवा अकाउंटन्सी जॉब्स, तर तुम्हाला त्या क्षेत्राशी संबंधित असलेला कॉन्टेन्टच बनवावा लागेल. यामुळे तुमचे श्रम कमी होईल आणि टार्गेटड ऑडियन्स देखील मिळेल. तर मित्रानो आपला चॅनेल आपण कोणत्या कॅटेगिरीमध्ये किंवा निस्च मध्ये बनवणार आहोत, ते ठरवूंन घेऊन त्याच्याशी मिळते जुळते किंवा संबंधित क्षेत्राशी साम्य, संलग्नता असणारे नाव चॅनेल साठी निवडावे.

Youtube

यानंतर Youtube चॅनेल सुरु करताना लागणाऱ्या काही इमेज आपल्याला तयार करायच्या आहेत. जसे कि youtube बॅनर इमेज, youtube चॅनेल लोगो आणि चॅनेल आयकॉन. जर का आपल्या डिझायनिंग येत नसेल तर घाबरू नका, आजकाल अश्या बऱ्याच ऑनलाईन वेबसाइट आहेत जिथे आपण काही क्लीकमध्ये या इमेजेस बनवू शकता. उदाहरणार्थ canva.कॉम, या वेबसाइट वर आपण लॉगिन करून अगदी काही मिनिटात आपल्याला हवा असणारा लोगो , बॅनर इमेज आणि आयकॉन इमेज बनवू शकता. आणि जर का आपल्याला adobe फोटोशॉप किंवा इतर कोणतेही डिझायनींग सॉफ्टवेअर वापरता येत असेल तर आपण youtube बॅनर इमेज 2048 x 1152 पिक्सएल या साईझ मध्ये बनवावी, तसेच youtube चॅनेल लोगो बनविताना तो 800 x 800 पिक्सएल या साईझ मध्ये बनवावा व चॅनेल आयकॉन हा 98 x 98 पिक्सएल या साईझ मध्ये बनवावा. या इमेजेस तयार झाल्यानंतर youtube ची ऑफिसिअल वेबसाइट open करावी व yotube वेबसाइट वर देखील मेल आयडी ने लॉगिन करावे.

आता आपण youtube च्या मेन पेज वर असणारा आहे. या पेजवर जर का आपण उजव्या साईटच्या वरील कोपऱ्यामध्ये पहिले असता आपल्या एक छोटासा व्हिडीओ कॅमेरा आणि त्यावर अधिक किंवा ज्याला आपण प्लस चे चिन्ह म्हणतो असा आयकॉन दिसेल, जर का तुम्ही तुमच्या कॉम्पुटर माऊसचा कर्सर या आयकॉन वर नेलात तर तुम्हाला क्रिएट असा शब्द दिसेल, तुम्ही त्या आयकॉन वर क्लिक करून देखील चॅनेल बनवू शकता किंवा youtube च्या पेज वर आपण लॉगिन केलेल्या मेल आयडी चा प्रोफाइल चित्र दिसत असेल, त्या प्रोफाइल चित्रावर क्लिक केले असता एक मेनू ओपन होईल ज्यामध्ये Youtube Studios ऑप्शन असेल. मेनू मधील Youtube Studios ऑप्शनवर क्लीक केल्यास आणखी एक विंडो ओपन होईल जिथे तुम्हाला सुरु करणार असणाऱ्या चॅनेल चे नाव विचारले जाईल.

YouTube

आता आपण ठरविलेले नाव वरच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाईप करावे आणि खाली दिल्या गेलेल्या क्रिएट बटन वर क्लिक करावे. यानंतर चॅनेलची प्रोफाइल इमेज, बॅनर इमेज आणि आयकॉन इमेज अपलोड करावी आणि सेव या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर बेसिक इन्फो या टॅबवर जाऊन चॅनेल बद्दलची माहिती १०० ते १५० शबनमध्ये लिहावि व पुन्हा सेव या बटनावर क्लिक करावे. बस झाले तुमचे youtube चॅनेल तयार. यानंतर Youtube Studios च्या डाव्या साईडला असणाऱ्या डॅश बोर्ड या ऑप्शन वर क्लिक करावे आणि त्यानंतर उपलोड विडिओ वर क्लिक करून तुम्ही बनविलेला व्हिडीओ अपलोड करून पब्लिश करू शकता.

YouTube

YouTube चॅनेल बनविल्या नंतर पैसे मिळायला कधी सुरवात होते.

YouTube चॅनेल बनविल्या नंतर तो सर्वात आधी मोनेटाईझ करून घ्यावा लागतो, यासाठी आपल्या चॅनलला १००० subscribers आणि ४००० तासांचा watch time चा टप्पा पूर्ण करावा लागतो. एकदा का तुमच्या चॅनेलवर १००० subscribers आणि ४००० तासांचा watch time पूर्ण झाला, कि youtube कडून तुम्हाला मोनेटाईझेशन सुरु करण्यासंदर्भातील नोटिफिकेशन तसेच ई-मेल येतो. यानंतर google ऍडसेन्स चे अकॉउंट बनवून तुमच्या YouTube चॅनेलला कनेक्ट करावे लागते. यानंतर YouTube तुमच्या चॅनेलचा रिव्हिव बघते आणि सर्व काही व्यवस्तीत असेल तर चॅनेल अँप्रुव्हड करते. यानंतर तुमच्या व्हिडिओजना किती views मिळतात, त्याप्रमाणे तुमच्या ऍडसेन्स अकाउंटमध्ये पैसे जमा होतात, हि रक्कम कमीत कमी $१०० असावी लागते, म्हणजे तुम्ही ती तुमच्या बँक खात्यातून विड्रॉल करू शकता. साधारण पने महिन्याच्या ७ ते ११ तारखे पर्यंत आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात.

मित्रानो youtube वर चॅनेल ग्रो होण्यासाठी सातत्याने काम करण्याची गरज असते, जर का विडिओ अपलोड करण्यामध्ये अनियमितता असेल, तर चॅनेल ग्रो होताना समस्या निर्माण होतात कारण youtube चे अल्गोरिदम असे सेट असते कि सातत्याने काम करणाऱ्या चॅनेल्स चे व्हिडीओ, ते जास्तीत जास्त लोकांना दाखविण्याचा प्रयत्न करत असते, पण जर का आपण विडिओ अपलोड करण्यामध्ये अनियमितता राखली तर तुमचा चॅनेल youtube कडून पुश केला जाणार नाही, जेणेकरून तुमच्या व्हिडीओजना view कमी मिळतील आणि पैसेही. त्यामुळे कामाचे सातत्य हे youtube वर यशस्वी होण्याचा मार्ग आहे.

तर मित्रानो आपण हि आपल्या आवडीच्या क्षेत्रासाठी youtube चॅनेल बनवून कामाच्या समाधानते सोबत पैसेही कमावू शकता. आशा आहे या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडेल, या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमचा चॅनेल अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकाल, youtube चॅनेल संदर्भात आपल्या मनात आणखी काही शंका किंवा प्रश्न असतींल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा, आम्ही त्या प्रश्नाचे निराकरण अवश्य करू. ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment