Facebook वर व्हिडीओ अपलोड करून पैसे कसे कमवायचे?

facebook वर व्हिडीओ अपलोड करून पैसे कसे कमवायचे?

नमस्कार, आजच्या या blog मध्ये आपण YouTube प्रमाणेच facebook वर चानेल तयार करून पैसे कसे कमवायचे?, facebook वर चानेल तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या स्टेप्स कराव्या लागणार आहेत, यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता भासणार आहे व facebook वर चानेल तयार झाल्यानंतर किती दिवसात आपले इन्कम चालू होते, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत, चला तर मग सुरवात करूया, facebook वर व्हिडीओ अपलोड करून पैसे कसे कमवायचे?

मित्रानो यासाठी सर्वात आधी आपले facebook account असणे गरजेचे आहे. तसे तर आजच्या युगात facebook account नसलेली व्यक्ती सापडणे फारच कठीण गोष्ट आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्रास प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी, आजूबाजूला घडणार्या गोष्टींचा हिंदोळा घेण्यासाठी, ट्रेंड मध्ये काय चाललय याच्याशी कनेक्ट राहण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात, मग ते कॉलेज student असोत, working पीपल्स असोत वा रिटायर्ड व्यक्ती असोत.

तसेच सध्या बाजारात असणाऱ्या महागाई मुळे आपल्याला काटकसर करून जीवन जगावे लागते, मिळणारे इन्कम पुरत नसल्या कारणाने, अनेकजण सेकंड इन्कम च्या शोधात असतात, परंतु त्यांना हे इन्कम त्यांचा आहे तो जॉब करत किंवा आहे तो व्यवसाय उद्योग धंदा करत करायचा असतो. शिवाय कॉलेजच्या विध्यार्थ्यांना देखील पोकेट मनी म्हणू एखादा सोर्स हवा असतो, मित्रानो आज आम्ही आपल्याला अश्याच एका सोर्स बद्दल अगदी सविस्तर माहिती देणार आहोत, हा सोर्स अगदी खात्रीलायक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही, किंवा हा सोर्स सुरु करण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचे पैसे अथवा फीस भरावी लागत नाही, शिवाय हे काम तुम्ही तुमच्या जवळ असणर्या स्मार्ट फोनवरून, तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता. तर मित्रानो हा सोर्स म्हणजे facebook वर व्हिडीओ अपलोड करून पैसे कमावणे.

Facebook ची कार्य प्रणाली कशी चालते?

मित्रानो आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच youtube माहित असेल, आपण youtube वर व्हिडीओ देखील पाहत असाल, व आपल्याला हेही माहित असेल किंवा आपण ऐकले असेल कि youtube वर व्हिडीओ अपलोड करून पैसे मिळविले जातात, तर मित्रानो हे कार्य कश्या पद्धतीने चालते, तर मित्रानो google च्या अनेक जायंट कंपन्या आहेत, ज्यामध्ये youtube, gmail, Android, Adwaord, Adsense इत्यादी. यातील Adwaord हि कंपनी Ad ajency च्या रूपाने कार्य करते. जगभरातील अनेक उत्पादक त्यांचे product विकण्यासाठी Adwaord च्या माध्यमातून त्यांच्या प्रोडक्ट्सची advertisement करतात.
या advertisement संबंधित लोकांन पर्यंत पोहोचविण्यासाठी काही platforms बनवले आहेत, जसे कि youtube किंवा blogging.

या platforms वर content creator त्यांचा content प्रदर्शित करतात, adsense त्या content मध्ये ads दाखवून ते product लोकांन पर्यंत पोहचवले जाते, व त्याबदल्यात त्या content creator पैसे दिले जातात. उदाहरणार्थ जर का आपण youtube content creator असाल व आपण youtube वरती व्हिदिओ अपलोड करत असाल, तर तुमचा चानेल monetize झाल्यानंतर त्यामध्ये ads दिसायला लागतात व त्याबदल्यात तुम्हाला पैसे दिले जातात, अथवा आपण blogging करत असाल, blogging म्हणजे एखादी informative स्वरुपाची website जिथे तुम्ही निरनिराळ्या पद्धतीचे लेख लिहिता, आपण पहिले असेल कि कॉर्पोरेट कंपन्यांच्या, govarnment च्या website सोडून, आपण एखादी माहिती मिळवण्यासाठी किंवा एकाद्या गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी एखादी website ला visit करता, तेंव्हा त्या website च्या पेज वर काही जागी ads दिसत असतात. व याच ads website वर दाखविल्याबद्दल त्या website च्या ओनर ला adsense कडून पैसे दिले जातात.

facebook च्या माध्यमातून पैसे कसे मिळतात?

तर मित्रानो अगदी याच प्रमाणे facebook हे देखील फक्त सोशल मिडिया platform नसून, जगातील एक मोठे Ad platform आहे. जगभरातील करोडो लोक एकमेकांशी facebook च्या माध्यमातून जोडले गेले आहेत, भारता सारख्या देशात तर जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त facebook users आहेत. तर मित्रानो facebook च्या देखील अनेक जायंट कंपन्या आहेत, ज्यामध्ये meta, Instagram, Threads, and WhatsApp इत्यादी. यातील meta या platform वर व्यवसायाशी संबंधित कार्ये केली जातात. अगदी ज्याप्रमाणे जगभरातील अनेक उत्पादक त्यांचे product विकण्यासाठी Adwaord च्या माध्यमातून त्यांच्या प्रोडक्ट्सची advertisement करतात. या advertisement संबंधित लोकांन पर्यंत पोहोचविण्यासाठी काही platforms बनवले आहेत, जसे कि youtube किंवा blogging.त्याच प्रमाणे जगभरातील अनेक उत्पादकांना त्यांचे product विकण्यासाठी facebook ने meta हा platform उपलब्ध करून दिलेला आहे. meta या platform माध्यमातून जगभरातील उत्पादक त्यांची उत्पादने लोकांन पर्यंत पोहचवू शकतात.

या ads प्रदर्शित करण्यासाठी meta या platform ला देखील content creators ची आवश्यकता असते. यासाठी meta ने creator studio हा पर्याय content creators ना दिला आहे, जिथे ते त्यांचे विडीओज अपलोड करून पैसे कमवू शकतात. तर मित्रानो facebook वर व्हिदिओ अपलोड करून पैसे कमावण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या facebook account मध्ये लॉगीन करून एक पेज तयार करावे लागेल, त्यापेज चे प्रोफाईल इमेज आणि banner इमेज, संबंधित पेज ची माहिती अपलोड करावी. यानंतर google search engine वर जावून search बॉक्स मध्ये facebook creator studio टाईप करून search बटनावर click करावे.

हे हि वाचा: Youtube चॅनेल सुरु करून पैसे कसे कमवाल ?

यानंतर आपल्याला पहिल्याच नंबरला creator studio हि website दिसेल, त्यावर click करून creator studio च्या dash बोर्ड वर जावे. यानंतर आता डाव्या हाताला असणार्या मेनू मधील सर्वात वरच्या पर्यामध्ये जावून आपले पेज सिलेक्ट करावे. व यानंतर create रील्स किंवा FB Watch वर click करून व्हिदिओ अपलोड करावेत. अश्या पद्धतीने विदिओ उपलोड करत राहिल्यानंतर जेंव्हा तुमच्या पेज चे फोलोर्स १०००० होतील आणि ३ मिनीटान पेक्ष्या जास्त वेळेच्या विदिओजना मागच्या ६० दिवसांमध्ये 1 मिनीटाचे कमीत कमी ३०००० views येतील तेंव्हा पेज चे monetization चालू करावे, म्हणजे तुमचे facebook पेज monetize होईल, यानंतर तुमचे बँक खाते creator studio शी जोडावे. म्हणजे व्हिदिओमध्ये येणाऱ्या in-stream ads चे पैसे तुमच्या खात्यावर येतील.

तर मित्रानो आपण हि आपल्या facebook account च्या माद्यमातून व्हिदिओ कंटेंट create करून पैसे कमवू शकता व आपली स्वप्ने, आपल्या गरजा पूर्ण करू शकता, अशा आहे हा लेख आपल्याला आवडेल, आपल्या या लेखाशी संबंधित काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आम्ही आपल्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन अवश्य करू, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment