शरीरात पाण्याची कमी झाल्यावर भांगचा हँगओव्हर राहातो. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्या. तसेच नारळ पाणी, फळांचा रस पिणे अधिक चांगले ठरु शकते.
रिकाम्या पोटी भांग प्यायल्याने त्याचा प्रभाव अधिक काळ राहातो. भांग पिण्यापूर्वी फळे, ओट्स, सलाद, कडधान्ये यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा.
हँगओव्हरमुळे डोकेदुखी आणि मळमळ सारख्या समस्या उद्भवतात. यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या त्यामुळे आराम मिळेल.
हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करु शकता. लिंबू पाण्यामुळे मळमळ कमी होते. तसेच डिहायड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.
हँगओव्हरच्या डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी किंवा फ्रेश वाटण्यासाठी कॉफी पितात. परंतु, यामुळे हँगओव्हर आणखी वाढू शकतो. त्याऐवजी तुम्ही हर्बल टी पिऊ शकता.