2024 IPL सीजनमध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली २०३ धावसंख्यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
IPL मध्ये खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असा अवॉर्ड दिला जातो.
2024 IPL सीजनमध्ये 7 विकेट्ससह पर्पल कॅपची कमान CSK चा वेगवान बॉलर मुस्तफिझूर रहमानकडे आहे.
ऑरेंज कॅपच्या यादीत विराट कोहली नंतर पहिल्या पांच खेळांडूमध्ये रियान पराग १८१ रन्स सह दुसऱ्या स्थानावर आहे.
हैदराबादचा बॅट्समन हेनरिक क्लासेन १६७ धावांसह या यादीत तिसरा क्रमांकावर आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन IPL मध्ये १४६ रन्स करून या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा बॅट्समन क्विंटन डी कॉक १३९ रन्स सह पाचव्या क्रमांकावर आहे.
IPL मध्ये पर्पल कॅपसाठी बांगलादेशचा वेगवान बॉलर मुस्तफिझूर रहमान आघाडीवर आहे, त्याने CSK साठी तीन सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या आहेत.
LSG चा फास्ट बॉलर मयंक यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत 6 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
GT चा बॉलर मोहित शर्मा आणि RR चा बॉलर युजवेंद्र चहल या याधीत प्रत्येकी सहा विकेट्ससह
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
दिल्लीचा बॉलर खलील अहमद या यादीत ५ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.